ड्रग्ज प्रकरणी अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मॅनेजरला अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला जेरबंद करण्यात पोलिसांना अखेर यश आले. चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश फरार झाला होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्तवाची माहिती मिळवली होती. त्यानंतर ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती.

समन्स बजावताच फरार

ऋषिकेश पवारच्या विरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. अटक टाळण्यासाठी ऋषिकेशने सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने तेव्हापासून त्याचा पत्ता नव्हता. एनसीबी अधिकारी ऋषिकेश पवाराचा शोध घेत होते. अभिनेते सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशांतचा नोकर दीपेश सावंत याच्या चौकशीतही ऋषिकेश पवारचं नाव आले होते.AM News Developed by Kalavati Technologies