अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

साईप्रसाद गुंडेवार हा गेली दोन वर्ष ब्रेन कॅन्सरने त्रस्त होता

मुंबई | हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार हा गेली दोन वर्ष 'ग्लायोब्लास्टोमा'(ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. त्याचे २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ब्रेन कॅन्सरचे ऑपरेशन अमेरिकेतील लॉस अँजेलिसमधील हॉस्पिटलमध्ये झाले होते. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या Splitsvilla, Season 4, स्टार प्लसवरील Survivor तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T.,  Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,The Card मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये त्याने विविध भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे. 

फॅशन डिझायनर सपना अमीन यांच्यासोबत २०१५ रोजी साई यांचा विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई शुभांगी, राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. अतिशय तरुण वयात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies