मुगल बादशहा शहाजहान यांच्या लूकमधील अक्षयकुमारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘अतरंगी रे'मध्ये शहाजहानच्या लूकमध्ये अक्षयकुमार

मुंबई | अभिनेता अक्षयकुमार आपल्या आगामी ‘अतरंगी रे' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील मुगल बादशहा शहाजहान यांच्या लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत अक्षकुमार हा ‘अतरंगी रे'मध्ये शहाजहानच्या लूकमध्ये अक्षकुमार ताजमहालच्या समोर हातात गुलाब घेऊन बसलेला दिसत आहे. या चित्रपटात अक्षयसह सारा अली खान काम करत आहे. तिने अक्षयचा हा लूक शेअर करत लिहिले की, यापेक्षा जास्त अतरंगी भेटू शकत नाही. ‘अतरंगी रे'च्या शूटिंगसाठी अक्षयकुमार, सारा अली खान, नसीरुद्दीन शाह आणि धनुष सध्या आग्रा येथे आहेत.

आग्रा येथील ताजमहाल येथे नुकतेच कलाकारांनी काही सीन शूट केले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ताजमहालमध्ये मर्यादितच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. ‘अतरंगी रे'मध्ये क्रॉस कल्चरल लव्ह स्टोरी दाखविण्यात येणार असून यात सारा अली खान, अक्षयकुमार आणि नसीरुद्दीन शाह हे पहिल्यांदाच एकत्रित काम करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies