'या' टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या, खारघर मधील घरात घेतला गळफास

लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसंच...

पनवेल : टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसंच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत त्याने आपलं आयुष्य संपवलं.  मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ तसंच अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत काम केलं होतं.वेब सीरिजमध्ये करत होता काम मनमीनतने काही मालिकांव्यतिरिक्त जाहिरातींमध्येही काम केलं होतं. तसंच आठ एपिसोड असणाऱ्या एका वेब सीरिजमध्येही काम करत होता. यामधील तीन एपिसोडमध्य तो दिसणार होता. याशिवाय अनेक एक्टिंग स्कूलमध्ये तो शिकवण्यासाठी जात होता. पण लॉकडाउनमुळे हे सगळंच बंद पडलं होतं. पुढील तपास खारघर पोलीस स्टेशन करत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies