सोशल मीडियावर दीपिकाने बदलले नाव, छपाकचा 'असा' प्रभाव

‘छपाक’चित्रपटामध्ये तिने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारली आहे.

मुंबई | गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री दीपिका पदुकोण चर्चेत आहे. तिचा 'छपाक' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. प्रेक्षकांची चित्रपटाला चांगलीच पसंती मिळात आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात गेली होती. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकास्त्र डागलं होतं. त्यामुळे ती सतत चर्चेत येत होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिने सोशल मीडियावर तिचे नाव बदलले आहे.

‘छपाक’चित्रपटामध्ये तिने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर दीपिकाने सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. विशेष म्हणजे दीपिकाने ट्विटरवर तिच्या नावात बदल करुन ‘मालती’ असं ठेवलं आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की मालती नक्की कोण आहे. तर ‘छपाक’ चित्रपटामध्ये दीपिका साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचं नाव मालती असं आहे.AM News Developed by Kalavati Technologies