यवतमाळ । कंटनेरच्या धडकेत 2 जागीच ठार 1 जखमी

कुंभ्यापासून 4 किमी अंतरावरील महागाव जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात सिमेंट कंटनेरने दुचाकीला जबर धडक दिली.

यवतमाळ | जिल्ह्यातील कुंभा मारेगाव रोडवरील महागाव वळणावर एका अज्ञात कंटनेरने दुचाकीला धडक दिल्याने सख्या चुलत भावांचा जागीच अंत झाला तर एक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.

कुंभ्यापासून 4 किमी अंतरावरील महागाव जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात सिमेंट कंटनेरने दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, मृतक भीमराव टेकाम वय 25 वर्षे व प्रदीप टेकाम वय 26 वर्षे राहणार झोटिंगदरा ता. मोहदा या दोघांच्याही अंगावरून गाडीचे चाके गेल्याने एकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्याचे शरीर पूर्णपणे विद्रुप झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies