बंडखोरी शिवसेना-भाजपच्या पथ्यावर पडणार?

बंडखोरांना सत्ता आल्यावर महामंडळावर नियुक्त करण्याचे आश्वासन

मुंबई । भाजप-शिवसेनेत युती झाली असली तरी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी युतीच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात तर काही ठिकाणी आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती. या बंडखोरांना थंड करण्यासाठी सेना भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले काही बंडखोरांना सत्ता आल्यावर महामंडळावर नियुक्त करण्याचे आश्वासनही दिलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी पक्षाला यश आल्याचे तर काही ठिकाणी प्रयत्न तोकडे पडल्याचे स्पष्ट झालं आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरुद्धही बंडखोरी करण्यात आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनीही रिंगणात कायम राहण्याचा निर्धार केल्याने लटकेची डोकेदुखी वाढली आहे. मुरजी पटेल यांच्या या मतदारसंघात चांगली पकड असल्याने विद्यमान आमदार रमेश लटके यांना तगडे आव्हान आहे. तसेच वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मातोश्री निवासस्थान येते. या मतदारसंघातून शिवसेनेन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यासाठी विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कापण्यात आल्याने नाराज झालेल्या सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वर्सोवा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या कमळ चिन्हावर भारती लव्हेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले. जागावाटपात ही जागा शिवसेनेला मिळेल, अशी आशा होती. मात्र, तसे न झाल्याने शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि नगरसेविका राजुल पटेल यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्ष त्यांचीही नाराजी दूर करू न शकल्याने राजूर पटेल ही निवडणुकीच्या मैदानात आहे.AM News Developed by Kalavati Technologies