पन्हाळ्यावर रोमँटिक गाणं का चित्रित केलंत? अमोल कोल्हेंना नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

पहिल्यांदा गडावर शुटींग आणि आता टीका!; खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | राष्ट्रवादी प्रवेशाआधी अमोल कोल्हेंनी पन्हाळा गडावर ‘मराठी टायगर्स’ या चित्रपटासाठी ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं शूट झालं आहे, असं सांगत काही नेटकरी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

‘हुरहुर लागे श्वासांना’ या गाण्याचं चित्रिकरण पन्हाळा गडावर झाल्याचं सांगत नेटिझन्सनी डॉ. अमोल कोल्हेंसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. गड किल्ल्यांविषयी पुळका आहे, मग चार वर्षांपूर्वी गड किल्ल्यांवर या रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण कसं केलंत? हा प्रश्न विचारला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies