जालन्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळं मृत्यू

आतापर्यंत जालन्यात 15 जणांचा मृत्यू

जालना | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. आज जिल्ह्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. या दोन मृत्यू मुळे जालना जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्याची संख्या आता 15 वर पोहचली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एक 85 वर्षीय वृद्ध 27 जूनला आणि नरिमन नगर येथील एक 55 वर्षीय व्यक्ती दि 28 जूनला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. या दोन्ही रूग्णांची प्रकृती चिंताजनक होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन्ही रूग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक होऊन आज सकाळी त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृतांची संख्या ही 15 झाली असून कोरोना बाधितांचाही आकडा 554 वर जाऊन पोहोचलाय.AM News Developed by Kalavati Technologies