एकविसाव्या शतकातील अंधारलेलं गाव, रस्ते-वीज-आरोग्यासह मूलभूत सुविधांंचा अभाव

स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली, हे युग डिजिटल युग म्हणुन उदयास आले.

गोंदिया | स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली, हे युग डिजिटल युग म्हणुन उदयास आले. नागरिकांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह मूलभूत सुविधा निर्माण करून देणे ही सरकारची जबाबदारी असते. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे मानव हा सुखसोयीसाठी नवेस्वप्न रंगऊन नव्या आसऱ्याच्या शोधात गुंतला असल्याचे दिसून येत आहे. कुटुंबातील सदस्य वाढले तसे जागेसह नवीन घरांची गरज वाढू लागली. तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत मधील तेरा कुटूंबाना नेमका हाच यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे, त्यांनी गावात जागा नाही म्हणून सेतशिवारातील मोकळ्या जागेत आसरा शोधून झोपड्या उभारून नवा संसार सुरू केला. मात्र, शासनाच्या आडमुठी धोरणाचे व लोकप्रतिनिधिंची निष्क्रियतेचे बळी ठरले आहेत, डोमाटोली येथील शेतकरी ग्रामस्थ.

एकविसाव्या शतकात, भारतासारख्या विकसनशील देशात जर एखाद्या गावात ते गाव उदयास आल्यापासून विजचं पोहचली नसेल, तर त्या गावातील ग्रामस्थांसाठी दुसरे दुर्दैव कोणते? पण हे खरे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत अंतर्गत डोमाटोली हे तेरा कुटुंबांचे गाव. वाढते कुटुंब व निवसाची अपूर्ण सोयींमुळे या कुटूंबप्रमुखांणी परसोडी गाव सोडून शेतशीवारातील मोकळ्या जागेवर 14 वर्षांपूर्वी झोपड्या थाटून संसार उभा केला. यांच्यासाठी शेती हा व्यवसाय व वनमजुरी हाच रोजगार झाला. रोजगाराच्या शोधात अनेक गावे ओसपडतात मात्र, या लोकांनी महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या उक्तीप्रमाणे महापूरषांचे विचार मोठे केले. मात्र, सरकार मायबापने या तेराही कुटुबांना चौदा वर्षाच्या वनवासानंतरही पायाभूत व मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचे घोर पाप केले असल्याची बाब समोर आली आहे.

वीज नाही म्हणुन चक्क खाद्य तेलाचे दिवे 

14 वर्षात या गावाला विजेची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी येथील निवासी तिन्ही ऋतूत निसर्गाशी दोन हात करून हालअपेष्टा सहन करत असल्याचे वास्तव आहे. सरकार शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याचा दावा करत आहे. मात्र, तो दावा डोमाटोली या गावावरून फोल ठरला आहे. एकीकडे शासनाने रॉकेल बंद केले. वीज नाही म्हणुन चक्क खाद्य तेलाचे दिवे लावून रात्र काढली जाते, विदर्भात सुर्यनारायनाचा कोप तापमान 46 अशांवर आहे. शरीराचीलाही करणाऱ्या उष्णतेत हे कसे जीवन जगत असतील याची कल्पना येते.

बाहेरच्या देशातील निर्वासितांना सरकार निवासाची व उदरनिर्वाहची सोय उपलब्ध करून देत असते मात्र...

येथील 13 पैकी फक्त 4 कुटुंबांना शौचालय मिळाले. अजूनही घरकुलाचा लाभ न मिळाल्याने ते झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. राज्यमार्गापासून केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला जायला पक्का रस्ता नाही. नवेगाव बांध व्याघ्रप्रकल्प अगदी काही अंतरावर असल्याने वन्य प्राण्यांचे भय आहेच. पिण्याच्या पाण्यासाठी एक हातपँप दोन वर्षांपूर्वी जिल्हापरिषद ने तयार केला आहे. एकीकडे बाहेरच्या देशातील निर्वासितांना सरकार निवासाची व उदरनिर्वाहची सोय उपलब्ध करून देत असते. मात्र, देशातीलमुळ नागरिकांशी हा दुजाभाव का? असा सवाल या गावातील नागरिक करत आहेत. गेली 10 वर्ष इथे भाजपाचे आमदार व विदयमान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री म्हणून राजकुमार बडोले आहेत. तेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, क्षेत्रातील जनता वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान आवास योजनेचा फज्जा या ठिकाणी उडाला असून स्मार्ट ग्राम योजना कुठं गेली असा सवाल नागरिक करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies