पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणीच पाणी

7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज

पुणे । पुण्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. पुण्यातल्या कात्रज, वानवडी, धनकवडी, सहकार नगर भागात मुसळधार पाऊस पडला. सासवड आणि पुरंदर भागात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. सिंहगड रस्ता, हडपसर आणि वानवडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

नोव्हेंबरच्या सुरूवातीलाच पुन्हा पावसानं एन्ट्री घेतली आहे. गोवा, कर्नाटक लगत समुद्रामध्ये महा चक्रीवादळाच्या परिणामुळे राज्यात येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, तळ कोकण आणि सौराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.AM News Developed by Kalavati Technologies