मुंबईतील पावसामुळे शाळा कॉलेजांना सुट्टी, परीक्षाही केल्या रद्द

आशिष शेलार यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

मुंबई | सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. अनेक दुर्घटनांमध्ये सामान्यांना जीव गमवावे लागले आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आला आहे. आता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

यासोबतच हवामान विभागाने मुंबईसह, नवी मुंबई, पालघर या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे येथील परिस्थितीच अधिकच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली. खरंतर मुंबईकर हा उकाड्याने हैराण झाला होता. पावसामुळे त्यांना सुरुवातीला दिलासा मिळाला मात्र आता या सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांचे हाल केले आहे. या पावसामुळे पालिकेच्या कामकाजाचे तीन तेरा वाजवले आहेत. मुंबईत पाऊस कोसळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी तुंबले, झाडे कोसळली, भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आजही तेच चित्र पाहायला मिळत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies