गोमांसाची वाहतूक करणारे वाहन संतप्त जमावाने पेटवले, रसूलपूर गावात तणाव

रसूलपूर गावात गोमांस घेऊन जाणारे वाहन ग्रामस्थांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. टाटा मॅजिक (एमपी 68 पी137) मधून चालक शेख वसीम शेख इस्माईल (रा.मदिना कॉलनी, रावेर) हा रसलपूर गावातून गोमांस घेऊन जात असताना त्याची गाडी गतिरोधकावर आदळली.

जळगाव | रसूलपूर गावात गोमांस घेऊन जाणारे वाहन ग्रामस्थांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. टाटा मॅजिक (एमपी 68 पी137) मधून चालक शेख वसीम शेख इस्माईल (रा.मदिना कॉलनी, रावेर) हा रसलपूर गावातून गोमांस घेऊन जात असताना त्याची गाडी गतिरोधकावर आदळली. या घटनेत दरवाजा उघडल्याने गोमांस भरलेली पिशवी गाडीतून खाली रस्त्यावर पडली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

रस्त्यावर पडलेले गोमांस पाहून जमाव संतप्त झाल्याने संतप्त जमावाने गोमांस भरलेले वाहन भररस्त्यावरच पेटवून दिले. रावेर पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवून पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी वाहनचालक शेख वसीम तसेच वाहन मालक शेख शकूर ऊर्फ कालू (रा.बंडू चौक) यांना अटक करण्यात आली आहे. रसलपूर गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies