वीजेवर चालणारी 'तेजस्विनी बस' नागपुर सार्वजनिक वाहतुक विभागाच्या ताफ्यात दाखल

या तेजस्विनी बसचे लोकार्पण महापौर नंदाताई जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले

नागपूर । महिला सक्षमीकरण व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस' या सार्वजनिक वाहतुकीच्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित होणारी 'तेजस्विनी बस' दाखल झाली आहे. सहा नवीन ग्रीन बस परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी पाच तेजस्विनी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या तेजस्विनी बसचे लोकार्पण महापौर नंदाताई जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यालयात जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. नागपुरातील सुमारे 72 हजार महिला दररोज सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करतात. या महिलांसाठी वाहतूक ही एक प्रमुख गरज आहे. डिजेलमुळे प्रदूषणात वाढ होते. त्यावर उपाय म्हणून पर्यायी उर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे. याचाच एक भाग म्हणून ईलेक्ट्रिक बस शहर प्रवासी वाहतूक सेवेत सामील करण्यात आल्या आहेत. या तेजस्विनी इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ नागपुरात करण्यात आला. नागपुरात या इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळे कार्बन डायऑकसाईड च्या उत्सर्जनाला आळा बसून वर्षाला चार लाख लिटर डिझलची बचत होणार असल्याचा अंदाज आहे. ऑलेक्ट्रा कंपनीच्या या बसेस 25 आसनी असून या बसेसमध्ये महिलांसाठी विशेष अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies