विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची निवड

विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई । विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेला उपसभापतिपद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्षपदाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं आहे. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यानंतर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे व पीआरपीचे जोगेंद्र कवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, जोगेंद्र कवाडे यांनी अर्ज मागे घेतल्याने नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. युतीत उपसभापतिपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे.

उपसभापतिपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा करू, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर ठेवल्याची चर्चा होती. आज सकाळी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. यानंतर उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेला उपसभापतिपद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्षपदाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.AM News Developed by Kalavati Technologies