जळगाव मनपाच्या महासभेत 42 कोटींच्या कामावरून शिवसेना नगरसेवकांनी भाजपाची उडवली खिल्ली

रस्त्यावर भाजपा कार्यकर्त्यांचं खड्ड्यात वृक्षारोपण करून शिवसेनेविराधी आंदोलन

राज्यात विधानसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजपाची युतीची घोषणा झाली असली तरी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिका सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात खड्ड्यांवरून भाजपच्या अनोख्या आंदोलनाने जिल्हावासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी रस्त्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले. तर जळगाव मनपाच्या झालेल्या महासभेत 42 कोटींच्या कामावरून शिवसेना नगरसेवकांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.  जिल्ह्यातील भाजप-सेनेची युती वादात आल्याचेही बोलले जात आहे. तसेच जळगाव मनपा व पाचोऱ्यात झालेल्या घटनेमुळे पुन्हा जिल्ह्यात युती वादात आली असल्याचे चिञ पाहायला मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies