उदयनराजेंचा पराभव करणाऱ्या श्रीनिवास पाटलांचा शरद पवारांकडून सत्कार

आमच्या मैत्रीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, अशा भावना सत्कारानंतर पवार यांनी व्यक्त केल्या

बारामती | साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजें पराभव केला. त्यानंतर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढच्या राजकीय इनिंगसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

गादीचा मान न ठेवणाऱ्यांचा जनतेने पराभव केला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी काल उदयनराजेंचा पराभव झाल्यावर दिली होती. तर श्रीनिवास पाटील यांना विजयी केल्याबद्दल मी साताऱ्यात जाऊन सातारकरांचे अभिनंदन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मैत्रीपुढे ज्यांनी कशाचीच फिकिर केली नाही असे माझे सवंगडी आणि आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा आज बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये सत्कार करताना खूप समाधान वाटले. यानिमित्ताने आमच्या मैत्रीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, अशा भावना सत्कारानंतर पवार यांनी व्यक्त केल्या.AM News Developed by Kalavati Technologies