रावेरकडून पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स उलटली, 25-30 प्रवासी जखमी

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे वाकोदजवळ हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने वाहतुक शेंदुर्णी सोयगावमार्गे वळवण्यात आली आहे.

पुणे | रावेरकडून पुण्याला जाणारी साईराम ट्रव्हल्स ही खाजगी लग्झरी बस रविवारी रात्री 11 वाजेदरम्यान शेंदुर्णी रेल्वेगेटजवळ उलटली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर शेंदुर्णी ग्रामिण रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसरी गाडी मागवून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

जळगाव औरंगाबाद महामार्गाची दुर्दशा झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे वाकोदजवळ हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने वाहतुक शेंदुर्णी सोयगावमार्गे वळवण्यात आली आहे. नवीन रस्त्याचा अंदाज आला नसल्याने वेगात जाणारी रावेर पुणे या साईराम ट्रव्हल्स शेंदुर्णी रेल्वेगेटजवळ उलटली. गाडी वेगात असल्याने तब्बल दिडशे फटापर्यंत फरफटत गेली. अपघात होताच मागून आलेल्या लग्झरीतील प्रवाशांनी उतरून अपघातग्रस्त गाडीच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. काहींनी तात्काळ 108 रूग्णवाहिकेला फोन करून मदत मागवली तर काहींनी पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. या अपघातात जखमी झालेल्या 20 ते 30 प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने शेंदुर्णी ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेAM News Developed by Kalavati Technologies