'वंचित आघाडीचं बटण दाबलं तरी कमळालाच मतदान', सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांनी सील केल्या मशीन

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमबाबत माध्यमांसमोर गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोलापूर | वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमबाबत माध्यमांसमोर गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनीही याविषयी माध्यमांसमोर तक्रार केली. सुजात म्हणाले की, अनेक ठिकाणाहून मला फोन येत आहेत. वंचित आघाडीचे बटण दाबले तरी मतदान कमळालाच होत असल्याच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी तक्रार करताच जिल्हाधिकाऱ्यांनी काही ठिकाणची मतदान यंत्रे सील केल्या आहेत.सोलापुरात राज्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत होत आहे. काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तीन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 11 वाजेपर्यंत सोलापुरात 19 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडीच्या तक्रारीही आल्या आहेत. यामुळे त्या-त्या जागेवर मतदारांना ताटकळत राहावे लागले आहे.

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

https://twitter.com/Awhadspeaks/status/1118769803546722304AM News Developed by Kalavati Technologies