फलटण ते लोणंद पहिली रेल्वे धावली फलटण करांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण

फलटण-बारामती हा रेल्वे मार्ग होण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला होता.

फलटण । फलटण ते लोणंद मार्गावर आज रेल्वे सेवा सुरू झाली फलटणकर आणि माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याची देही याची डोळा हा आनंदोत्सव हजारो लोकांना अनुभवता आला. ही भाग्याची गोष्ट असून रेल्वेच्या माध्यमातून फलटणचा आणखी चौफेर विकास होईल, असा आशावाद कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माणचे माजी आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्यां जिजामाला नाईक निंबाळकर, दिगंबर आगवणे, विश्वासराव भोसले पुणे रेल मंडळ प्रबंधक दिलीप देवस्कर आदी उपस्थित होते. फलटण-बारामती हा रेल्वे मार्ग होण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला होता. लोकसभेतही त्यांनी खासदार असताना वारंवार हा प्रश्न उपस्थित केला होता. या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा लोणंद ते फलटण या मार्गावरील रेल्वेसेवा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू करून फलटनकर जनतेचे आणि त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies