दोडामार्ग पोलीस ठाण्यात नारायण राणे नितेश राणेंच्या भेटीला

प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी, आमदार नीतेश राणेंनसह त्यांच्या 18 समर्थकांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याप्रकरणी ते पोलीस कोठडीत शिक्षा भोगत आहेत

सिंधुदुर्ग । राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 18 समर्थकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार नीतेश राणे यांना अटक केल्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी एक वाजता राणे यांना पोलीस कोठडीत आणण्यात आले. तर दुपारी साडे तीन वाजता त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे दोडामार्ग पोलीस ठाण्यात नितेश राणेच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांची ते भेट घेणार आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर नारायण राणे कणकवली चिखलफेक प्रकरणी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी खासदार निलेश राणे ही दोडामार्ग पोलीस ठाण्यात नितेश राणेंच्या भेटीसाठी आले आहेत. प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी, आमदार नीतेश राणेंनसह त्यांच्या 18 समर्थकांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याप्रकरणी ते पोलीस कोठडीत शिक्षा भोगत आहेत.

दरम्यान, हायवे ठेकेदार प्रकाश शेडेकर चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी उचललेल्या पावलाचे सर्वच स्तरावर समर्थन होत आहे. काल कणकवली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती त्यापाठोपाठ आज देवगड व वैभववाडी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies