नागपूर | पेट्रोल पंप दरोडा व हत्या प्रकरण; दोन अल्पवयीन मुलांसह 5 जणांना अटक

नागपूरच्या आऊटर रिंग रोडवर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर गुरुवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला होता.

नागपूर | हिंगणा तालुक्यात आऊटर रिंग रोडवरील पेट्रोल पंप दरोडा व हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह 5 आरोपींना अटक केली आहे. तर या दरोड्याचा मास्टरमाइंड असलेला आरोपी मात्र अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अवघ्या 24 तासात या हत्याकांड व दरोडा प्रकारणाचा उलगडा केल्याने तपास पथकाला नागपूर पोलीस आयुक्तांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. नागपूरच्या आऊटर रिंग रोडवर असलेल्या इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपावर गुरुवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला होता. मुख्य आरोपी सागर बावरी त्याच्या पाच साथीदारांसह पेट्रोल पंप पोहचला. झोपेत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने घाव घातले ज्यात पांढरी भांडारकर यांचा जागीच मृत्यू झाला तर लीलाधर गोहीते हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान हल्ला करून पेट्रोल पंपावरील एक लाख रुपयांची रोकड घेऊन आरोपी पसार झाले. पेट्रोल पंप हिंगणा तालुक्यातील अट्टल गुन्हेगार सागर बावरी अनेकदा येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बावरी च्या साथीदाराला ताब्यात घेऊन विचारपूर केल्यावर या दरोडा व हत्याकांडाची त्यांनी कबुली दिली. गुन्ह्यातील अन्य चार आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार सागर बावरीचा शोध घेत आहेत. बावरी हा अट्टल गुन्हेगार असून तीन वर्षांपूर्वी नागपुरातील एका प्राचार्याची हत्या केली होती. काही महिन्यांपूर्वी तो जामीनवर बाहेर आला होता.AM News Developed by Kalavati Technologies