मिलिंद देवरांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची स्वीकारली जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत मुंबई शहर काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापण्याची शिफारस

मुंबई । काँग्रेस पक्षाला मुंबईत एक मोठा झटका बसला आहे. कारण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा देताना मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसला एक शिफारस केली आहे. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत मुंबई शहर काँग्रेसचं नेत्रृत्व करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापण्याची शिफारस त्यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांनी आपल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाने मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा सांभाळण्यास दिली होती. मात्र, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवून देता आला नाही.AM News Developed by Kalavati Technologies