औरंगाबाद शहरात घुसला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू 

शहरातील एन-वन परिसरामध्ये घुसला आहे बिबट्या

औरंगाबाद | शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वन विभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी नऊपर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता. 

गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्त्यांमध्ये येऊन बिबट्यांचे हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. आज औरंगाबाद शहरातील एन वन सिडको परिसरामध्ये सकाळी स्थानिक रहिवाशांना मॉर्निंग वॉक करीत असताना बिबट्या आढळला. यानंतर तातडीने पोलिसांना आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. आता वन विभागाच्यावतीने पिंजरा, जाळे आणून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शनची तयारी केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies