कोरोना लसीबाबत केजरीवाल सरकारची मोठी घोषणा, दिल्लीतील जनतेला मिळणार मोफत कोरोना लस

येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार असून, दिल्लीतील जनतेला फ्री कोरोना लस देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे

नवी दिल्ली । देशात नववर्षाला कोरोना लसीसंदर्भात आनंदाची बातमी आल्यानंतर, येत्या 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे. केंद्राने जर दिल्लीतील जनेतेला मोफत लस दिली नाही तर, दिल्ली सरकार जनतेला मोफत लस उपलब्ध करून देईल. असा विश्वास केजरीवाल यांनी जनतेला दिला आहे. केजरीवाल यांनी केंद्राकडे आधीपासूनच दिल्लीतील जनतेसाठी मोफत लस द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र केंद्राकडून अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. त्यामुळे केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत मोफत कोरोना लस उपलब्ध करून दिली जाईल. अशी घोषणा केली आहे.

भारतात गरिबाचं प्रमाण अधिक असून, गेल्या 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनेतला करावे लागत असून, हे खर्च त्यांना न परवडणारे असे आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत देण्यात यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्राकडून याबाबत कोणताही निर्णय आलेला नसून, दिल्लीतील जनतेचा लसीकरणाचा खर्च दिल्ली सरकार करेल. अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies