आनंदाची बातमी! देशात पहिल्या टप्प्यात 30 कोटी जणांना दिला जाणार कोरोनाचा डोस

रशियाने कोरोनाचा डोस देण्यास सुरूवात केली आहे, त्यानंतर आता भारतात देखील कोरोना लसीच्या डोसाबद्दल योजना आखल्या जात आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 1 लाख 13 हजार जणांचा जीव घेतला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा सुद्धा 74 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळे आता कोरोनाची लस कधी येते याची जनता आतुर्तेने वाट पाहत आहे. रशियाने कोरोनाची स्वदेशी लस 'स्पुटनिक व्ही' तयार केली असून, रशियातील नागरिकांना लसीचं डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारत सुद्धा लसीबाबत सज्ज झाला असून, कोरोना लसीचं डोस देण्याबाबत योजना आखल्या जात आहे. कोरोनाला हद्दपार करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू आहे.

त्यानंतर आता पहिल्या टप्प्यात देशात सुमारे 30 कोटी जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात येणार असून, त्याची सुची तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये कोरोनाचा जास्त धोका असलेल्या व्यक्तींना तसेच हेल्‍थकेयर, पोलीस, सॅनिटेशन अशा व्यक्तींचा यात समावेश असणार आहे. या 30 कोटी जणांसाठी सुमारे 60 कोटी कोरोना लसीच्या डोसांची आवश्यकता भासणार आहे. एकदा की कोरोना लसीची मान्यता मिळाली, त्यानंतर तात्काळ कोरोनाचा डोस देण्यास सुरूवात होईल.

आरोग्य मंत्रालयाकडून चार प्रॉयरिटी सुची जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये 50 ते 70 लाख वैद्यकीय क्षेत्रातले, 2 ते 3 कोटी कामगार आणि 50 वर्षापुढील 26 लाख जणांना ही लस दिली जाणार आहे. कोरोना परिस्थिती आणि लसीच्या डोसाबद्दल केंद्रीय एजेंन्सी आणि राज्याकडून यासंबंधी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतली होती. त्याअंतर्गत ही सुची जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या 23 टक्के जणांना कोरोनाचा डोस देण्याची योजना आखण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies