101 निसर्गोपयोगी वृक्षांची लागवड, सावंगीत फार्मा फ्रेंडस ग्रुपने जपले सामाजिक भान

वैद्यकीय शिबिरे, सामाजिक उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून फार्मा फ्रेंड्स ग्रुप नेहमीच सक्रिय.

औरंगाबाद । सावंगी सारा परिवर्तन येथील फार्मा फ्रेंड्सच्या सर्व सदस्यांतर्फे आज 101 निसर्गोपयोगी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी या वृक्षारोपणासाठी फार्मा फ्रेंड्स चे सदस्य आणि सावंगी ग्रामपंचायत यांचे विशेष सहकार्य लाभले. सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबवल्याचे सदस्यांनी सांगितले.

101 वृक्षांची लागवड
वृक्षारोपणामध्ये मुख्यत्वे वड, पिंपळ, कडुलिंब, सप्तपर्णी, चिंच, मोहगनी, जांभूळ, बदाम यांचा समावेश होता. फार्मा फ्रेंड्सच्या सर्व सदस्यांनी सावंगी गावातील परिसर, जिल्हा परिषद शाळा, दत्त मंदिर, सुखदेव महाराज मठ, सारा परिवर्तन सोसायटी या विविध ठिकाणी वृक्षांची लागवड केली. याचबरोबर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे असे आवाहनही फार्मा फ्रेंडसच्या वतीने करण्यात आले.

नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा फार्मा फ्रेंडस हा ग्रुप सारा परिवर्तन, सावंगी येथील आहे. फार्मा कंपनीत काम करणाऱ्या मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह आणि एरिया मॅनेजर यांचा हा ग्रुप असून वैद्यकीय शिबिरे, सामाजिक उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते नेहमी सक्रिय असतात.
या कार्यक्रमात पराग रूम, राहुल देवरे, नीलेश शिंदे, योगेश बनसोड, राहुल जैस्वाल, गणेश गिराम, अतुल पंडित, किशोर पाटील, संतोष ढोरमारे, धनंजय जवळकर, हरीश हवालदार, सुभाष पडोळे, मिलिंद गायकवाड, गौरव गावंडे, गणेश गिराम, गोपाळ जाधव, महावीर क्षीरसागर, महेंद्र परिहार, राहुल मालोदे, स्वप्नील धांडे, अमोल पाटील, दीपक देशपांडे यांचा विशेष सहभाग होता. सरपंच राऊत मॅडम आणि उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.AM News Developed by Kalavati Technologies