धुळे । दोरीने गळफास घेऊन आत्महत्या, मृत्यू पूर्वी चिठ्ठीत लिहिलं 'हे' कारण

बस स्थानकावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

धुळे । मुंबई आग्रा हायवेवर शिरपूर जवळील टोलनाक्याजवळ आढे फाट्यावरील बस स्थानकावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश भिमराज धाकड (वय 73) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते शिव बाबा आयुर्वेदिक औषधे दुकानाचे मालक होते. मृत्यू पूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मी माझ्या जीवास कंटाळून आत्महत्या करीत आहे तरी यास कुणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies