डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण । सुसाइड नोट रिकव्हर करण्यात पोलिसांना यश

पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिन्ही महिला आरोपींची नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई । मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. फॉरेन्सिक टीमने डॉ. पायल ताडवीच्या मोबाइलमधून डिलीट करण्यात आलेल्या सुसाइड नोट्सच्या फाइल्स रिकव्हर केल्या असून पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिन्ही महिला आरोपींची नावे लिहिलेली होती हे स्पष्ट झाले आहे.

गुन्हे शाखा या आठवड्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करणार आहे. फिर्यादीचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आरोपी महिलांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पायलने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आरोपींनी जातीवाचक शब्द आणि अभद्र शिवीगाळ केल्याचे म्हटले होते. गुन्हे शाखेला आता आरोपी महिलांविरुद्ध भक्कम पुरावे मिळाले असल्याचेही वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

ज्या दिवशी पायलने आत्महत्या केली त्या दिवशी तिला तू अपात्र आहेस, असे आरोपी महिला डॉक्टर म्हणाल्या होत्या, अशी हॉस्पिटल स्टाफने कबुली दिली आहे. यामुळे आरोपी हेमा आहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती महेर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. पायल तडवीने लिहिलेली सुसाइड नोट 3 आरोपींनी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या सुसाईट नोटचा स्क्रीनशॉट फोनमधून रिकव्हर करण्यात फॉरेन्सिक विभागाला यश आल्याची माहिती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies