चिपळूणमध्ये धरणग्रस्त शेतकऱ्यांचे खेकडा वाटप आंदोलन

नुकसान भरपाई द्यावी अन्यथा खेकडेच शेतकऱ्यांना त्यांच्या जागा परत मिळवून देतील आंदोलकांचा इशारा

सातारा । चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटने पासून खेकडा हा महाराष्ट्रभर चांगलाच गाजत आहे. आज पाटण तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी नेते विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेत्रृत्वात खेकडा वाटप आंदोलनात भाग घेत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. छोट्या मोठ्या धरणांचा तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. अनेक वर्षापासून रखडलेली धरणे व शेतकऱ्यांची पिळवणूक यासाठी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेत्रृत्वात तहसिल कार्यालया समोर खेकडा वाटून शासनाच्या खेकडाव्रुतीचा निषेध करण्यात आला. गेली 15 वर्ष जमीन संपादन करुन जमीन कब्जा करुन ठेवली, त्यामुळे धड शेती पण करु शकत नाही. नुकसान भरपाई यांच्या नावाने तर अजून वाट पाहावी लागत आहे. एकतर प्रशासनाने शेतकऱ्यांना तत्काळ रखडलेली नुकसान भरपाई द्यावी अन्यथा खेकडेच शेतकऱ्यांना त्यांच्या जागा परत मिळवून देतील असा इशारा आंदोलक यांनी यावेळी दिला.AM News Developed by Kalavati Technologies