कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 674 कोरोनाबाधितांची भर, तर 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 89 हजार 761 एवढा झाला आहेत

नागपूर । नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 674 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 89 हजार 761 एवढा आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 996 जणांवर उपचार सुरू आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 हजार 912 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 79 हजार 853 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 674 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 298 तर शहरी भागातील 367 जणांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपुर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागपुरकरांच्या चिंतेच आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies