Corona In India : देशात गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 50 लाखांच्या पार

गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा आंकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त जणांना लोकांना ग्रासलं आहे. तर सुमारे 82 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 39 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 90 हजार 123 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 290 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाख 20 हजार 360 एवढा झाला आहे. तर 82 हजार 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 39 लाख 42 हजार 361 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना या भयावह विषाणूनं जगभरातील सुमारे 180 पेक्षा जास्त देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. सुमारे 2 कोटी 94 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 9 लाख 33 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 2 कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies