मायावतींच्या बैठकीत फेरबदल, नेत्यांना बैठकीला मोबाईल-घड्याळ-जोडेही काढून जावं लागलं

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत.

एएम न्यूज नेटवर्क | उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. मायावतींनी त्यांचे भाऊ आनंद कुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर भाचा आकाश आनंद याच्याकडे राष्ट्रीय संयोजक पदाचा पदभार दिला आहे. मायावतींच्या लखनऊतल्या घरी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी आलेल्या सर्व नेत्यांना बैठकीसाठी जाताना त्यांचे मोबाईल, घडाळ, जोडे बाहेर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तर महिलांना गळ्यातले दागिनेही काढून ठेवण्यास सांगण्यात आलं होत.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मायावती यांनी देशभरातील पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपली बॅग, मोबाइल फोन, पेन, कारच्या चाव्या बैठकीच्या खोलीबाहेर ठेवाव्या लागल्या. लोकसभा निवडणुकीत बसपाला 10 जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. उत्तर प्रदेशातील 12 विधानसभेच्या पोटनिवडणुका बसपा स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा मायावती यांनी नुकतीच केली होती. या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची यावरही बैठकीत चर्चा झाली असून अंतिम यादी लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies