बुलडाणा जिल्हापरिषद अध्यक्षांची बैलगाडीतुन एंट्री

नवनिर्वाचित जिल्हापरिषद अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

बुलडाणा ।  जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मनीषा पवार यांनी बैलगाडी मधून जिल्हा परिषद आवारात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनिषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला तर शिवसेनेच्या कमल बुधवत यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा पदभार हा एक दिवस आधीच स्वीकारला होता. आज जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून बैलगाडीमध्ये बसून जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर महा विकास आघाडीच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांसह रॅली काढण्यात जिल्हा परिषदेमध्ये पदार्पण केले. पदभार स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे यावेळी अध्यक्षा मनिषा पवार यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies