'या' आयारामांना भाजपने दिली संधी, गणेश नाईकांना वगळले

पहिल्या यादीमध्ये 11 महिला उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई | विधानसभा निवडणुकांची लगबग राज्यात सुरू आहे. या निवडणुकांसाठी भाजपकडून 125 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 52 विद्यमान आमदारांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीमध्ये 12 आमदारांचा पत्ता कट केल्याचे चित्र आहे. तर पहिल्या यादीमध्ये 11 महिलांना उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पक्षांतर केलेल्या आयारामांनाही संधी देण्यात आली आहे.

आयाराम लढणार या मतदारसंघातून
शिवेंद्रसिंह राजे भोसले- सातारा
कालिदास कोळंबळकर- वडाळा
हर्षवर्धन पाटील - इंदापूर
राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी
राणा जगजितसिंह- तुळजापूर
जयकुमार गोरे- माण
वैभव पिचड- अकोले

भाजपने सर्व आयारामांना संधी दिली आहे. मात्र यामधून नवी मुंबईतील गणेश नाईकांचे नाव वगळण्यात आले आहे. या मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे गणेश नाईक यांनी भाजपा प्रवेशामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता व्यक्त वर्तवण्यात आली होती यामुळे मंदा म्हात्रे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तर गणेश नाईकांचा पत्ता कट करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies