वांद्रे : एमटीएनएलच्या इमारतीला आग; आतापर्यंत 84 जणांना वाचवण्यात यश

आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल

वांद्रे । एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या आगीत  तब्बल 100 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यातील 60 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून अजूनही बचाव कार्य व  आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 84 जणांना बाहेर काढले आहे. अडकलेल्या लोकांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. इमारतीत अद्याप 25  ते 30 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, रूग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या 31 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एमटीएनल इमारतीच्या लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही इमारती नऊ मजल्याची आहे.AM News Developed by Kalavati Technologies