धक्कादायक! अंत्यविधीस जागा उपलब्ध नसल्यानं थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर केला मृत महिलेचा दफनविधी

अंत्यविधीस जागा उपलब्ध नसल्यानं, थेट ग्रामपंचायत समोर केला महिलेचा दफनविधी, जालना जिल्ह्यातील राजूर येथील घटना

भोकरदन (कमलकिशोर जोगदंडे) तालुक्यातील राजूर येथे लिंगायत समाजाच्या एका महिलेचा दफनविधी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार लिंगायत समाजासाठी 2011 पासून कुठेही स्मशानभूमीची जागा उपलब्ध नाहीये. आज सकाळी लिंगायत समाजाच्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्यानं मयत महिलेचा दफनविधी करण्यासाठी जागा देण्यात यावी अशी विनंती केल्यानंतरही ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध न करुन दिल्यानं संतप्त लिंगायत समाजाने महिलेचा मृतदेह थेट राजूर ग्रामपंचायतमध्ये आणला. 

ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, यांना धारेवर धरून थेट ग्रामपंचायतीसमोरच महिलेचा दफनविधी केला. याप्रकरणी शिवा संघटना व मृत महिलेच्या नातेवाईकांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज राजूर ग्रामपंचायत तर्फे पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके सह पोलिस कर्मचारी दाखल झाले होते.AM News Developed by Kalavati Technologies