हर्षवर्धन पाटलांचा भाजप, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले -...

...त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच आधीच भाजपात जायचं ठरलं होत

बारामती । माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र आठ दिवसांपूर्वी इंदापूर येथे केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आमची फसवणूक केली असा घणाघात केला होता. यावर प्रथमच आज अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या जागावाटपावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झाली यावेळी ते म्हणाले की, आम्ही तुम्हांला लोकसभेला मदत करू मात्र, विधानसभेची जागा आम्हाला सोडा. यावर मी म्हणालो की, या जागेचा निर्णय राहुल गांधी व शरद पवार घेतील व तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यामुळे आम्ही शब्द पाळला नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पवार पुढे म्हणाले की, हर्षवर्धन पाटलांनी आमच्यावर टीका केल्यावर मी त्यांना 50 ते 55 फोन केले. त्यांनी उचलले नाहीत. स्वतः त्यांच्या पुण्याच्या फ्लॅटवर गेलो ते भेटले नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच आधीच भाजपात जायचं ठरलं होत, ते आता आमच्यावर बिल फडात आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांना थोडं थांबा म्हणत होते. दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यात विधानसभा व विधान परिषद असा तोडगा काढता आला असता पण त्यांनाच भाजपात जाण्याची घाई होती.

एकीकडे राज्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना मदत करायचं सोडून ते महाजनादेश यात्रेत मश्गुल आहेत. लोकांना भावनिक करून राजकारण करत आहेत. साध्य नेते पक्ष बदलत आहेत. मात्र त्यामागची कारणे वेगळी आहेत. अनेकांना पैशांचे आमिष दाखवले जात आहे. तर कुणाला ईडी , सीबीआय ची भीती दाखवली जात आहे. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे लोकसभेच्या आधी सरकार जोरदार टीका करायचे मात्र ईडी ने त्यांची दिवसभर चौकशी केली. त्यामुळे आता राज ठाकरे बोलताना दिसत नाहीत. टीका करणाऱ्या मुस्कटदाबी केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies