विजयी होताच रोहित पवारांनी ‘त्या’ कार्यकर्त्याला घातला शर्ट

विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांची घरी जाऊन त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी शानदार विजय संपादित केला आहे. त्यांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा दारूण पराभव केला आहे. मात्र अस असल तरी निवडणूक संपल्यावर रोहित पवार यांनी सुसंकृत राजकारणाचा उत्तम नमुना समाजासमोर ठेवला आहे. निवडणुकीचा निकाल लागताच रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जात त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला आहे. रोहित पवार यांच्या या कृतीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

तर दुसरीकडे आपल्या आवडत्या नेत्यांसाठी कोण काय करेल, हे सांगता येत नाही. कोणी चप्पल घालत नाही तर कोणी शेंडीची गाठ बांधत नाही. आता रोहित पवार हे कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडून येत नाही, तोपर्यंत माऊली लाड या पाटेगावच्या कार्यकर्त्याने शर्ट न घालण्याचा निर्धार केला होता. आता रोहित पवार यांनी विजयी होताच आपल्या हाताने या कार्यकर्त्याला शर्ट घातला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचा तब्बल 43,347 मतांनी पराभव केला. विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांची घरी जाऊन त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले आहेत. तर चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतलेAM News Developed by Kalavati Technologies