'भाजपमध्ये दत्तक पुत्रांना न्याय मिळतो, मलाही मिळेल'

गडकरी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - एकनाथ खडसे

जळगाव । 'भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना न्याय मिळतो. दत्तक व सावत्र पुत्रांना न्याय मिळतो, मग मी तर पक्षातच जन्माला आलोय. 1980 पासून पक्षाच्या स्थापनेपासून काम करतोय. इथंच लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पक्ष मला दूर लोटणार नाही. नक्कीच न्याय देईल,' अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

गडकरी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अगोदर जे ठरले आहे तसेच होईल. नितीन गडकरी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलताना सांगितले.

खडसे आत्मचरित्र लिहिणार

सध्या माझ्याकडे भरपूर वेळ आहे. बऱयाच गोष्टी अशा आहेत की त्या समोर आलेल्या नाहीत. माझी इच्छा आहे की काहीतरी लिहिले पाहिजे. सुरेश जैन कट्टर विरोधक असतानाही ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांना मुंबईला घेऊन गेलो होतो. हे फक्त गडकरींना माहीत आहे. राज्याच्या राजकारणावर त्या त्यावेळी परिणाम करणारे असे अनेक किस्से आपल्याकडे असून त्यावर एक उत्तम पुस्तक होऊ शकेल, असे सांगत खडसे यांनी आत्मचरित्र लिहिणार असल्याचे संकेत दिले.AM News Developed by Kalavati Technologies