मुंबई । कपूर घराण्यातील ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ होते. अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. चेंबूर येथील इंलॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झाले आहे. नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.
कपूर कुटुंबातील आणखी एक तारा आज बॉलिवूडने गमावला आहे, सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. राजीव कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली' 'एक जान एक हम' या चित्रपटातील भुमिकांमध्ये ते प्रसिद्ध होते. त्यांनी 1990 साली जिम्मेदार हा शेवटचा सिनेमा केला होता. त्यानंतर ते दिग्दर्शक आणि निर्मितीकडे वळाले होते.
View this post on Instagram