मुंबई । आज पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे मालगाडीचे 5-6 डबे घसरले असल्याची माहिती समोर आली आहे. डबे हटवण्याचं काम सुरू आहे. परंतु त्यामुळे मुंबई पुणे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

CPRO, Central Railway: Local trains will not be affected due to derailment, however, they may be delayed slightly due to heavy rains. https://t.co/TYOh197od8
— ANI (@ANI) July 1, 2019
तसंच या अपघातामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच पुणे भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर कोयान एक्स्प्रेसही मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
मुंबईहून पुणेमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन्स या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे.