शिरूर । अनंतपाळ निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील एका 35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खुन केल्याची घटना शिरोळ वांजरवाडा बसस्थानका समोरील मांमा भांजे हॉटेलसमोर समोर घडली.
मागील कुरापत काढून खुन केल्याची घटना घडल्यासंदर्भात शिरुर अनंतपाळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर अनंतपाळ पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की निटूर आऊट पोष्ट अंतर्गत असलेल्या निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील मयत राजेंद्र रघुनाथ जाधव (वय -35 वर्ष ) व प्रसाद जाधव हे दोघे गावातील बसस्थानकावरील मामा भांजे हॉटेल समोर बोलत उभे असताना चुलत भावासह सात जणांनी येवून रात्रीच्या व पुर्वीच्या मागील भांडणाचे कुरापत काढून मारहाण करून चाकू सारख्या तीक्ष्ण हत्यारांनी राजेंद्र रघुनाथ जाधव यांच्या पाठीवर सपासप वार करून खून करण्यात आला आहे. अशी तक्रार प्रसाद हणमंतराव जाधव यांनी शिरूर अनंतपाळ पोलिसात दि 22 जुलै रोजी तक्रार दिल्याने, मुख्यआरोपी सुरेश दिलीप जाधव, यांच्यासह 6 जनां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुरेश दिलीप जाधव एकच आरोपी अटक असून बाकी फरार आहेत.
35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून
35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून
