वर्ध्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; वीज पडून शेतकऱ्याची दोन जनावरे दगावली

ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी आशिष पाटील यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वर्धा | जिल्ह्यात रात्री अचानक सुरू झालेल्या विजेच्या कळकळानेसह हमदापुर शिवारात पाऊसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी वीज पडून हमदापुर येथील शेतकरी आशिष पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन बैल व एक गायी पैकी विजेच्या धक्क्याने एक बैल एक गाय जागीच गतप्राण झाले. तर बाजुला बांधुन असल्याने थोडक्यात बचावला. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी आशिष पाटील यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies