ब्रिटनच्या राजघराण्यात शाही पाहुण्याचे आगमन, प्रिन्स हॅरी- मेगन मार्कल यांना पुत्ररत्न, वर्षभरापूर्वी झाले होते लग्न

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. गतवर्षी 19 मे रोजी मेगन आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाह झाला होता.

एएम न्यूज नेटवर्क । ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. गतवर्षी 19 मे रोजी मेगन आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाह झाला होता. मेगनच्या लग्नात आंतरराष्ट्रीय तारका प्रियंका चोप्रासह अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. हे रॉयल लग्न लंडनमध्ये पार पडले होते.

शाही बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असून आपल्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया प्रिन्स हॅरी यांनी दिली. आम्ही दोघेही रोमांच अनुभवत असून मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो, असेही प्रिन्स हॅरी म्हणाले.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, मेगन यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. शाही कुटुंबात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू होती. या वृत्तामुळे राजघराण्यात आणि संपूर्ण ब्रिटनमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मेगन मार्कल यांचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी लॉस एंजलिसमध्ये झाला. मेगन लहान असतानाच त्यांचे आईवडील विभक्त झाले होते.

मेगन यांचे संगोपन त्यांच्या आईने केले. मेगन यांनी इल्यनॉइसच्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे. तत्पूर्वी मेगन मार्कल यांचा 2011 मध्ये ट्रेव्हर एंगेल्सन यांच्याशी विवाह झालेला होता, परंतु दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.AM News Developed by Kalavati Technologies