रिलायन्स जिओच्या ग्राहकांना बसणार झटका; 6 डिसेंबरपासून योजना 40 टक्यांनी महागणार

जरी नवीन योजना 40 टक्क्यांपर्यंत महाग असतील, पण...

नवी दिल्ली । आता देशात स्वस्त कॉलिंगचा टप्पा संपुष्टात येणार आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया नंतर आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनेही मोबाइल दर वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की 6 डिसेंबरपासून मोबाइलचे दर 40 टक्क्यांनी वाढतील. कंपनीने रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ऑल इन वन योजनेंतर्गत मोबाइल सेवा दर वाढविले जातील, ज्यामध्ये ग्राहकांना 300 टक्के पर्यंत लाभ मिळेल."

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, 'जियो लवकरच ऑल इन वन योजना आणेल, ज्यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस आणि डेटा मिळेल. या योजनांनुसार ग्राहक इतर मोबाइल नेटवर्कवरही सहज कॉल करु शकतील. जरी नवीन योजना 40 टक्क्यांपर्यंत महाग असतील. पण कस्टमर फर्स्टच्या आश्वासनानुसार ग्राहकांना 300 टक्के अधिक लाभ दिला जाईल.AM News Developed by Kalavati Technologies