मुंबईची बत्ती गुल; मुंबईसह उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल

मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर तसेच परतीचा पाऊस सुरूच असतांना, दुसरीकडे राज्याची राजधानी मुंबईची बत्ती गुल झाली आहे. आज सकाळी मुंबईसह उपनगरामध्येही अचानक वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन लोकलसेवा सुद्धा ठप्प झाली आहे.

मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप आणि बोरिवली परिसरात आज सकाळी अचानक पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तसेच मुंबईसारख्या शहरात अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर सुद्धा वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. सर्व स्थानकांवर लोकल थांबलेल्या पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या तासाभरापासून प्रवासी लोकलमध्येच खोळंबले आहे.AM News Developed by Kalavati Technologies