फेसबुक मेसेंजरमध्येही आता डार्क मोड, डोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी अॅपमध्ये नवी सुविधा

| स्मार्टफोनच्या स्क्रिनमधून येणाऱ्या प्रकाशामुळं डोळ्यांना होणारा त्रास लक्षात घेता अनेक अॅप्स सध्या डार्क मोडचं फिचर युझर्सना पुरवत आहेत.

एएम न्यूज नेटवर्क | स्मार्टफोनच्या स्क्रिनमधून येणाऱ्या प्रकाशामुळं डोळ्यांना होणारा त्रास लक्षात घेता अनेक अॅप्स सध्या डार्क मोडचं फिचर युझर्सना पुरवत आहेत. यातच आता फेसबुक मेसेंजरचाही समावेश झालाय. फेसबुक मेसेंजरनही युझर्ससाठी डार्क मोड फीचर उपलब्ध करून दिलाय. त्यामुळं फेसबुक मेसेंजर चेक करताना युझर्सच्या डोळ्यांना त्रास होणार नाही.

असे करा नवे फिचर अॅक्टिव्ह

डार्क मोड फिचर अॅक्टिव्ह करण्यासाठी युझर्सना मेसेंजरमधील लिस्टमधील एका व्यक्तीला क्रेसेन्ट मून म्हणजेच अर्धचंद्राचा इमोजी पाठवावा लागणार आहे. त्यानंतर मेसेंजरमध्ये डार्क मोड फीचर उपलब्ध असल्याचा संदेश येईल आणि हे फिचर अॅक्टीव्ह होईल. वापरकर्त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून हे फीचर फेसबूकनं उपलब्ध करून दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies