बदलापूर । बदलापूर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीने चक्क आपल्या पत्नीला अमेरिकेतील महिलांसारखे कपडे घालत नाही. तसेच अमेरिकन इंग्लिश बोलता येत नसल्याने पतीने पत्नीचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली असून, मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने बांद्रा पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी ती करत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमुळे महिला असुरक्षितच असल्याच्या घटना समोर येत आहे. NRI मुलांशी लग्न करावं अश्या बऱ्याच अविवाहित मुलींची इच्छा असते. जेणेकरून विदेशात राहता येतील आणि विदेशातील सुख सुविधांचा आस्वाद घेता येईल, परंतु आता विदेशी नवरा हवा म्हणून अट्टाहास करणाऱ्या मुलींना सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
कारण विदेशात राहणाऱ्या मुलांच्या अपेक्षा ही भिन्न असू शकतात. विदेशात जरी गेलो नसलो तरी, मात्र आपल्या पत्नीने विदेशी पेहराव करून विदेशी संस्कृतीप्रमाणे आपले राहणीमान ठेवावे अशा अपेक्षा झाल्या आहेत. असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये राहणाऱ्या विवाहिते बरोबर घडला आहे . नवी मुंबईमधील खारघर स्थित अमेरिकेत राहून आलेल्या आणि उच्च शिक्षित असलेल्या मुलाचे स्थळ आलं म्हणून, बदलापूर येथे राहणाऱ्या आई वडिलांनी 4 मार्च रोजी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करून दिल. मुलगी देखील उच्चशिक्षित असून ती डॉक्टर आहे. पीडित मुलगी बदलापूर येथे आरोग्य अधिकारी म्हणून काम करते. मात्र पत्नी अमेरिकेतील महिलांसारखे कपडे घालत नाही. तसेच तिला अमेरिकन इंग्रजी बोलता येत नसल्याने, शिवाय जेवणाच्या चपात्या गोल बनवता येत नसल्याने लग्न झाल्यानंतर नवऱ्या मुलाने पीडित मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
जमिनीवर बसायचे, जमिनीवर झोपायचे अशी जबरदस्ती करुन तिचा मानसिक छळ करू लागला. अखेर माझं मन जुळत नाही असे बोलून तिला मारहाण करून माहेरी पाठवले. अनेक वेळा समजूत घालून ही ऐकत नसल्याने अखेर या छळाला कंटाळून, पीडित पत्नीने पती सुयोग पाटील, सासू जयश्री पाटील आणि सासरे संभाजी पाटील आणि अन्य लोकांच्या विरोधात आणि सासरच्या लोकांच्या विरोधात मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आपल्याला न्याय मिळावा अशी ती मागणी करत आहे. म्हणून NRI मुलांशी लग्न करावं अशा इच्छा असणाऱ्या अविवाहित मुलींनी सावधान राहण्याची गरज निर्माण झाली आहे. NRI मुलाशी लग्न करताना त्यांच्या आवडी-निवडी आणि अपेक्षा जाणून घ्या. अन्यथा पश्चात्ताप झाल्यास त्याला जवाबदार तुम्हीच राहणार.