कामाची बातमी! आजपासून गॅस रिफील बुकिंग करण्याची पद्धत बदलली; जाणून घ्या नवी पद्धत...

इंडेन गॅस बुकिंगची पुर्वीची सेवा बंद झाली असून, कंपनीने आता नवीन क्रमांक जारी केला आहे

नवी दिल्ली । (सलमान शेख) आज देशातील प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येकाला महिन्या दोन महिन्याला गॅस सिलेंडर बुकींग करावा लागतो. त्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून इंडेन गॅस बुकिंगचा क्रमांक बदलणार आहे. त्यामुळे आता तुम्ही पुर्वी सारखा ओटीपी गॅस बुक करू शकणार नाही. कारण आजपासून गॅस सिलेंडरच्या नियमात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बदल करण्यात आले आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी म्हणून ओळखली जात असून, कंपनीच्या वतीने बुकिंग क्रमांक बदलण्यात आला आहे. इंडेनने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन नंबर जारी केला आहे. IVR किंवा SMS द्वारे आपला इंडेन गॅस रिफील बुक करू शकता. आजपासून बुकिंगसाठी ग्राहकांना 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावे लागणार आहे. आपण आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर सुद्धा गॅसची बुकिंग करू शकतात. त्यासाठी आपल्याला 7588888824 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर REFILL असे टाइप करावे लागणार आहे.

गॅस सिलेंडरची बुकिंग झाल्यानंतर डिलिव्हरी घेतांना आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. तसेच आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies